१४० वर्षांची परंपरा जपत खेंड येथील श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिरात आषाढी एकादशी उत्सव उत्साहात होणार साजरा
चिपळूण : :

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील खेंड परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिरात शनिवार, दि.२५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी उत्सव पारंपरिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.तब्बल १४० वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरातील उत्सवासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
उत्सवानिमित्त मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा, अभिषेक,कीर्तन, भजन, नामस्मरण तसेच पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिरसाचा जागर अनुभवायला मिळणार आहे.श्री देव विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी तसेच उत्सवातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिर मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सर्व विठ्ठल भक्तांना उत्सवासाठी प्रेमपूर्वक निमंत्रण दिले असून, “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या जयघोषात आषाढी एकादशीचा हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.




