Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बँकेचा पुढाकार

रत्नागिरी :

रत्नागिरी (पवन न्यूज) सहकार क्षेत्रात सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक तसेच कार्यकर्त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिला मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे निवासी सहकार कार्यकर्ता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सहकारी संस्थांसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारी कायदे, आर्थिक व्यवस्थापन, संचालक मंडळाची जबाबदारी, लेखापरीक्षण, बँकिंग क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान आणि संस्थांचे प्रभावी प्रशासन याबाबत सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण सहकार क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत निवासी स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रबंध संस्थान, पुणे तसेच कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण (ता. चिपळूण) यांचे सहकार्य लाभणार आहे.
सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, संचालक तसेच सहकार क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिला मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे.
इच्छुकांनी प्रशिक्षण प्रवेश अर्ज व आवश्यक माहिती आपल्या तालुक्यातील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयातून किंवा रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयातील प्रशासन विभागातून प्राप्त करून २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींस प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!