Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

दैवज्ञ समाजाच्या गुणवंतांचा खेडमध्ये भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

खेड :

दैवज्ञ समाजाच्या गुणवंतांचा खेडमध्ये भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

खेड, (प्रतिनिधी) : विश्वेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., खेड, दैवज्ञ समाज विठ्ठल-रखुमाई देवस्थान मंडळ आणि रुक्मिणी देवी महिला मंडळ, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार कै. जगन्नाथ (नाना) शंकर शेठ यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुणगौरव सोहळा शनिवारी (१ ऑगस्ट) सौ. विजयालक्ष्मी मुरलीधर पेंडुरकर सभागृह, सोनार आळी, खेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात दैवज्ञ समाजातील शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेले विद्यार्थी, इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कष्ट, जिद्द आणि गुणवत्तेचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष संजय दांडेकर, नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, रुक्मिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मिनल शेखर गुहागरकर, प्रमुख अतिथी म्हणून कोकणरत्न पुरस्कारप्राप्त उद्योजक मिलिंदशेठ सैतवडेकर (दापोली), श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स, चिपळूणचे मालक राजेंद्र वेस्वीकर, मिरकर ज्वेलर्सचे माधव (भाई) मिरकर, ज्येष्ठ कबड्डीपटू रविंद्र लवेकर, उद्योजक राजू तारकर, अमोल नाचणकर, अजित दांडेकर, उदय दांडेकर, भूषण वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. भविष्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी ज्येष्ठ समाजबंधू चंद्रविलास कारेकर, मनोज पावसकर, प्रताप दांडेकर, भूषण कारेकर, डॉ. सौ. नेहा दांडेकर, स्मिता गुहागरकर, सौ. संपदा गुजराथी, कृतिका धामणकर, माया गुहागरकर, जाई धामणकर, सौ. नेहा मुरूडकर यांच्यासह दैवज्ञ समाजातील महिला, पुरुष आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून समाजातील शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!