चिपळूणच्या खाद्यसंस्कृतीत चविष्ट पर्वाची भर! एकाच ठिकाणी आज दोन नव्या खाद्यदालनांचे दिमाखात उद्घाटन
‘मालवणी हाऊस’मध्ये अस्सल कोकणी स्वाद, तर ‘VIA.BENNE’मध्ये दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी

येवा, चव कोकणची आसा!’ या संकल्पनेतून खवय्यांना मिळणार मालवणी चवींचा आनंद बेन्ने, इडली अन् कॉफीचाही घेता येणार आस्वाद
चिपळूण (ओंकार रेळेकर) : चिपळूण शहरातील खाद्यप्रेमी आणि खवय्यांसाठी आनंदाची बातमी असून, शहराच्या खाद्यसंस्कृतीत आणखी दोन नव्या खाद्यदालनांची भर पडणार आहे. परशुराम नगर येथे आज रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी ‘Shinde Mala’s मालवणी हाऊस’ आणि ‘VIA.BENNE’ या दोन खाद्यदालनांचा शुभारंभ होणार आहे. अस्सल कोकणी खाद्यपरंपरेचा दरवळ आणि दक्षिण भारतीय पदार्थांची चव एकाच परिसरात अनुभवण्याची संधी यानिमित्ताने खवय्यांना उपलब्ध होणार आहे.
चिपळूण शहरात गेल्या काही वर्षांत खाद्यसंस्कृतीचा विस्तार होत असून, विविध चवींचे पदार्थ चाखण्यासाठी नागरिकांकडूनही विशेष पसंती दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नव्याने सुरू होणाऱ्या या दोन खाद्यदालनांमुळे खाद्यप्रेमींना वेगळ्या चवींचा अनुभव घेता येणार आहे.





