Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

मंगळागौरीच्या उत्सवातून चिपळुणात स्त्रीशक्तीचा जागर

भाजप चिपळूण शहर व ग्रामीण महिलांतर्फे २६ ऑगस्ट रोजी आयोजन

मंगळागौर सादरीकरण व कष्टकरी महिला सन्मान सोहळा

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टी, चिपळूण शहर व ग्रामीण महिलांच्या वतीने मंगळागौर सादरीकरण आणि कष्टकरी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘परंपरेचा उत्सव… स्त्रीशक्तीचा जागर!’ या संकल्पनेतून होणारा हा कार्यक्रम बुधवारी (ता. २६) दुपारी १ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
मंगळागौरच्या उत्साहातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच कष्टकरी महिलांच्या कार्याचा सन्मान करून स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महिलांच्या पारंपरिक कलागुणांना आणि सामूहिक सहभागाला व्यासपीठ उपलब्ध करून देत मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून “मंगळागौरीच्या उत्साहात संस्कृती जपूया… कष्टकरी महिलांच्या सन्मानातून स्त्रीशक्तीचा गौरव करूया!” हा संदेश देण्यात येणार आहे. समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कष्टकरी महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला गटांनी २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभाग नोंदणीसाठी सौ. सारिका भावे (सरचिटणीस, चिपळूण शहर मंडल : मोबाईल ८३२९७६०५२५) तसेच सौ. आदिती गुडेकर, अध्यक्ष, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा : मोबाईल ९४२०७३७२६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.चिपळूण शहर व ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मंगळागौरीच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा जपावा आणि कष्टकरी महिलांच्या सन्मानातून स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर आणि चिपळूण शहर महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर यांनी केले आहे.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी १० मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या कोणत्याही एका योजनेचे सादरीकरण कार्यक्रमात समाविष्ट करावे, अशी अट ठेवण्यात आली आहे. सादरीकरणासाठी लागणारे सर्व साहित्य सहभागी गटांनी स्वतः घेऊन यावे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहून आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!