
चिपळूण (ओंकार रेळेकर) महिलांना राजकारणात समान संधी आणि प्रतिनिधित्व मिळावे यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष झाला आहे. महिला आरक्षण हा केवळ कायदा नसून महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे. हा निर्णय महिलांच्या हक्कांवर घाला आहे.
म्हणूनच चिपळूण मध्ये महिला, युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने चिंचनाका येथे सकाळी 11 वाजता जाहीर आंदोलन केले आंदोलनाच्या वेळी नागरिकांचा काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विरोधात आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला…
महिलांच्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज उठवताना चिपळूण च्या नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला
या वेळी काँग्रेस हाय हाय या काँग्रेस च करायचं काय..
खाली डोकं वर पाय. काँग्रेस कि पहचान.नारी शक्ती का अपमान अशा प्रकारच्या आक्रमक घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाच्या वेळी उपास्थित.उपनगराध्यक्ष सौ रुपाली दांडेकर,जिल्हा साइचिटणीस सौ सुप्रिया ताई उतेकर, युवक जिल्हाध्यक्ष श्री राहूल पवार,तालुका अध्यक्ष श्री विनोद जी भुरण, शहर अध्यक्ष
शशिकांत जी मोदी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक सौ शितल रानडे, महिला मोर्चा शहरअध्यक्ष, नगरसेविका सौ रसिका ताई देवळेकर, महिलामोर्चा तालुका अध्यक्ष सौ आदिती गुडेकर
जिल्हा चिटणीस सौ नयना पवार, नगरसेवक अंजली कदम नगरसेवक संदीप जी भिसे नगरसेवक व युवक शहर अध्यक्ष शुभम जी पिसे शहर सरचिटणीस सारिका भावे ,पुनम काजारी, रुही खेडेकर पालकर मॅडम स्वाती देवळेकर विभावरी जाधव विमल लढढा, पूजा कदम, प्राजक्ता टकले,प्रणिता घाडगे नरेंद्र बेलवलकर, अमोल तटकरे,महेश दीक्षित विनोद भोबस्कार,अभिषेक राजापूरकर, अभिषेक जागुष्टे, अमेय सुर्वे,संकेत चिले,दिनेश लटके, जतीन घटे,सचिन कांबळीराकेश भुरण मंगेश चिले ,पल्लवी भोसले, आरती भोसले, निशा कोलगे, राधा फाळके आदी उपस्थित होते….




