महाराष्ट्र
नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा
शनिवार दि.९ मे रोजी आभार मानून कार्यकर्त्यांशी थेट साधणार संवाद

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी हा सन्मान पक्षासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते कोकणातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यात प्रमोद जठार विविध मंडळांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करणार आहेत. तसेच आगामी काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही ते करणार आहेत.
📌 दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
🔹 राजापूर पश्चिम व राजापूर पूर्व
🕙 सकाळी १०.०० वा.
📍 राजापूर भाजप कार्यालय
🔹 लांजा दक्षिण व लांजा उत्तर
🕦 सकाळी ११.३० वा.
📍 शासकीय विश्रामगृह, लांजा
🔹 रत्नागिरी शहर, मध्य, दक्षिण, उत्तर
🕑 दुपारी ०२.०० वा.
📍 भाजप जिल्हा कार्यालय, रत्नागिरी
🔹 संगमेश्वर उत्तर व दक्षिण
🕔 सायंकाळी ०५.०० वा.
📍 गोळवली प्रकल्प, ता. संगमेश्वर
🔹 चिपळूण शहर व ग्रामीण
🕖 सायंकाळी ०७.०० वा.
📍 मार्कंडी, चिपळूण
या दौऱ्यादरम्यान आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे.




