महाराष्ट्र

चिपळूणच्या खाद्यविश्वात दोन नव्या दालनांची भर! ‘शिंदे मळा हाऊस’ आणि विया बेंने’चा दिमाखदार शुभारंभ

आ.भास्करराव जाधव व माजी आ.रमेशभाई कदम यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न

 

राजकीय, सामाजिक, सहकार आणि व्यावसायिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण (ओंकार रेळेकर)कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीला आधुनिक आदरातिथ्याची जोड देत चिपळूणच्या व्यावसायिक क्षेत्रात दोन नव्या खाद्यदालनांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मार्कंडी येथील ‘शिंदे मळा हाऊस’ आणि विया बेंने’ या दोन उपक्रमांचे रविवारी सायंकाळी राजकीय,सामाजिक,उद्योजक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.आमदार भास्करराव जाधव आणि माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते या दोन्ही दालनांचे उद्घाटन पार पडले. राजकीय,सामाजिक, सहकार, नगरपरिषद आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रंगला.या उद्घाटन सोहळ्याला विविध राजकीय पक्षाची नेते मंडळी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने एक वेगळे वातावरण पाहायला मिळाले.शिवसेना नेते आ.भास्कर जाधव,माजी आ.रमेश कदम,माजी आ.सदानंद चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!