कापडी कुटुंबीयांनी कष्टातून उभे केले हॉटेल-केटरिंग क्षेत्रातील साम्राज्य : आ. भास्कर जाधव
देवरुखमध्ये ‘ओमेगा गार्डन हॉल’चे उद्घाटन!

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणमधील कापडी कुटुंबीयांनी अत्यंत कष्ट, प्रामाणिकपणा आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर हॉटेल व केटरिंग व्यवसायात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खाद्यपदार्थांची उत्कृष्ट चव, ग्राहकांशी आपुलकीचे संबंध आणि दर्जेदार सेवा यामुळे ‘ओमेगा’ हा ब्रँड संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी काढले.
देवरुख येथील सावरकर चौकात उभारण्यात आलेल्या ‘ओमेगा गार्डन हॉल’च्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी ते बोलत होते.चिपळूणमधील कापडी कुटुंबीय गेली अनेक वर्षे हॉटेल आणि केटरिंग व्यवसायात कार्यरत आहेत. ‘ओमेगा हॉटेल’, ‘ओमेगा इन’ यांसारख्या हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. श्री. कल्पेश कापडी यांनीही या व्यवसायात अनेक वर्षे काम करताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी चार वर्षे माटे- भोजने हॉलचे व्यवस्थापन व केटरिंग सांभाळले होते. आता संतोष उर्फ बंड्या जाधव यांच्या जागेत भाडेतत्त्वावर अत्याधुनिक ‘ओमेगा गार्डन हॉल’ची उभारणी केली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, माजी मंत्री तथा माजी आमदार रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच चिपळूणचे नगरसेवक अजय भालेकर, उमा देसाई, देवरुखचे नगरसेवक बाळा कामेरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंद्रथ खताते, शिक्षक नेते बबन बांडागळे, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, संचालक निहार गुडेकर, खेर्डीचे सरपंच दशरथ दाभोळकर, सतीशअप्पा खेडेकर, बाळू ढवळे, मंगेश माटे, दीपक खेडेकर,तरुण उद्योजक प्रथमेश कापडी, राजू वणकुंद्रे, प्रदीप पाटणे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, रामू पंदेरे, अनंत जाधव, वैश्य समाज संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, रोहन चौधरी, प्राजेश खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत कल्पेश कापडी, मिलिंद कापडी, अनघा कापडी,साजन कापडी, बिपिन कापडी आणि बापू कापडी यांनी केले.यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, देवरुखामध्ये ७०० आसन क्षमता असलेला, रत्नागिरी-संगमेश्वर या दोन्ही भागांसाठी अत्यंत सोयीच्या ठिकाणी आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सुरू झालेला ‘ओमेगा गार्डन हॉल’ हा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे. या सुसज्ज व देखण्या हॉलमुळे देवरुख शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माजी मंत्री रवींद्र माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, देवरुख शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत गेल्याने मोठ्या हॉलची गरज निर्माण झाली होती. पंतजोशी हॉलनंतर माटे- भोजने हॉल आणि मराठा भवन उभे राहिले; मात्र वाढत्या मागणीमुळे आणखी सुविधेची आवश्यकता होती. ‘ओमेगा गार्डन हॉल’मुळे देवरुख, संगमेश्वर व परिसरातील नागरिकांची मोठी गरज पूर्ण झाली आहे.माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी सांगितले की, कल्पेश कापडी यांनी चार वर्षे माटे- भोजने हॉलचे व्यवस्थापन करताना आपल्या हातच्या चवीने, उत्तम नियोजनाने आणि आपुलकीच्या स्वभावाने देवरुखवासीयांची मने जिंकली आहेत. भविष्यात ‘ओमेगा गार्डन हॉल’ नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करेल आणि कल्पेश कापडी यांना या व्यवसायात आणखी यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात हॉलसाठी जागा उपलब्ध करून देणारे संतोष उर्फ बंड्या जाधव, हॉलची उभारणी करणारे ठेकेदार भरत राऊत आणि आर्किटेक्ट राज राऊत यांचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कल्पेश कापडी यांचाही सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाला देवरुख, संगमेश्वर, चिपळूण परिसरातील व्यावसायिक, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले.
फोटो : देवरुखमध्ये ‘ओमेगा गार्डन हॉल’चे उद्घाटन करताना भास्कर जाधव यांच्यासह आ.शेखर निकम,माजी मंत्री रवींद्र माने आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




