Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पीड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रेयांश बनेची सुवर्ण कामगिरी

दोन सुवर्णपदकांसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 

चिपळूण(ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पीड चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत कु. रेयांशा बने याने दमदार कामगिरी करत ५०० मीटर आणि १००० मीटर शर्यतीत सुवर्णपदके पटकावत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
दि. ६ व ७ जून रोजी पुणे येथे स्केटिंग असोशिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत रेयांशने उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. या यशासोबतच त्याची राष्ट्रीय स्तरावरील रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा झारखंड येथे होणार आहे.कु.रेयांश पृथा पराग बने याने आतापर्यंत गोवा, म्हैसूर, केरळ, कलकत्ता आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईतील भांडुप परिसरात राहणारा रेयांश हा युरो स्कूल येरोली या शाळेचा विद्यार्थी आहे.
स्केटिंग क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रेयांशने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये तब्बल ४१ सुवर्ण, १५ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण ६४ पदके जिंकली आहेत. इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदके मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची गणना होत असून त्याची स्केटिंगमधील घोडदौड अविरत सुरू आहे.
रेयांशच्या या यशामुळे त्याचे पालक, नातेवाईक, हितचिंतक तसेच भांडुप परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याच्या पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!