Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चिपळूणात २० रोजी हिंदुत्व जाणून घेऊया. राष्ट्रभावना बळकट करूया! विचार जागृती व्याख्यानमाला

ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदयजी निरगुडकर हिंदुत्व: भारतीयत्वाची व्यापक संकल्पना या विषयावर देणार व्याख्यान

चिपळूण (ओंकार रेळेकर):-रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या पुढाकारातून हिंदुत्व जाणून घेऊया. राष्ट्रभावना बळकट करूया! विचार जागृती व्याख्यानमाला शनिवार दिनांक २० जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. हिंदुत्व: भारतीयत्वाची व्यापक संकल्पना या विषयावर ज्येष्ठ पत्रकार विचारवंत तथा अभ्यासक डॉ.उदयजी निरगुडकर व्याख्यान देणार आहेत.

हिंदुत्व ही प्रामुख्याने एक सांस्कृतिक आणि राजकीय विचारधारा आहे. ‘हिंदू धर्म’ हा एक वैयक्तिक धर्म किंवा उपासना पद्धती आहे, तर ‘हिंदुत्व’ ही भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाला जोडणारी एक व्यापक संकल्पना आहे.हिंदुत्वाचा मूळ अर्थ आणि इतिहास:सांस्कृतिक राष्ट्रवाद: हिंदुत्वाचा मुख्य उद्देश भारताला एकसंध संस्कृती आणि सामायिक वारशाचा देश मानणे हा आहे. या विचारसरणीनुसार, सिंधू नदीपासून ते हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या भूमीला आपली मातृभूमी आणि पुण्यभूमी मानणारे लोक म्हणजे हिंदू आणि त्यांची संस्कृती म्हणजेच हिंदुत्व होय.

एक आधुनिक राजकीय विचार म्हणून हिंदुत्व ही संकल्पना विनायक दामोदर सावरकर यांनी १९२३ मध्ये मांडली. त्यांच्या मते, “हिंदू” ही केवळ एक धार्मिक ओळख नसून ती या भूमीवरील संस्कृती आणि इतिहासाने जोडलेली एक राष्ट्रीय ओळख आहे.व्यापकता: अनेक विचारवंतांच्या मते, हिंदुत्व ही संकुचित न राहता सर्वसमावेशक जीवनपद्धती आहे, ज्यामध्ये विविधतेचा सन्मान करणे अंतर्भूत आहे.हिंदुत्वाचा विचार नवीन पिढीसमोर आणखी प्रगल्भतेने जावा, यासाठी रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पुढाकार घेतला असून ‘जाणून घेऊया महाराष्ट्र भावना बळकट करूया! विचार जागृती व्याख्यानमाला अंतर्गत हिंदुत्व भारतीय व्यापक संकल्पना या विषयावर ज्येष्ठ पत्रकार विचारवंत तथा अभ्यासक डॉ.उदयजी निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या व्याख्यानासाठी सर्व राष्ट्रप्रेमी, युवा वर्ग, विद्यार्थी अभ्यासक व नागरिकांनी उपस्थित राहून हिंदुत्व विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!