Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक कार्यकर्ते अब्दुल शेख, शाहिद शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी येथे भाजपच्या जम्बो पक्षप्रवेश सोहळ्यात चिपळूण मधील गोवळकोट येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक अब्दुल शेख तसेच शाहिद शेख यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांसह शेख पिता पुत्रांनी भाजपची धुरा स्वीकारली.
शेख कुटुंबीयांचे सामाजिक कार्य चिपळूण परिसरात विशेष उल्लेखनीय राहिले आहे. महापूर, कोरोना महामारीसारख्या संकटकाळात त्यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. विविध सामाजिक उपक्रम, आपत्तीग्रस्तांना मदत, तसेच समाजहिताच्या कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.
अब्दुल शेख यांनी बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य कौतुकास्पद मानले जाते. शाहिद शेख यांनीदेखील विविध सामाजिक उपक्रमांतून जनसामान्यांशी मजबूत नाते निर्माण केले आहे.
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे चिपळूण शहर आणि गोवळकोट परिसरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या पक्षविस्तार मोहिमेला शेख बंधूंच्या प्रवेशामुळे आणखी मजबुती मिळाल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!