Welcome to Pavan News 2611
Click to listen highlighted text!
Welcome to Pavan News 2611
चिपळूण : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना शाखा भोम व सुभाष चव्हाण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून गावातील सुमारे ९० शालेय मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.कार्यक्रमास तालुकाप्रमुख सुभाष जाधव, विभागप्रमुख नितीन निकम, उपविभागप्रमुख नंदू चव्हाण, शाखाप्रमुख चंद्रकांत शिर्के, सुभाष चव्हाण, वामन चव्हाण, शिवाजी चव्हाण, संदीप चव्हाण, गणपत चव्हाण, महेश शिर्के, दिलीप बामणे, रमेश बामणे, आत्माराम कुंभार, दयाराम बामणे, राजू पदिरे, दत्ताराम आदवडे, लवूकाका चव्हाण, रमेश चव्हाण, अविबुवा चव्हाण, अस्मित चव्हाण, मुन्ना चव्हाण, राहुल कांबळे, दर्शना शिर्के, राजा साळुंखे यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
फोटो : शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी आणि विद्यार्थी छायाचित्रात दिसत आहेत
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!