Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उल्लेखनीय कामगिरीचा शिवसेना आमदार किरण सामंत यांनी केला विशेष गौरव

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक क्षेत्रात सातत्याने नोंदविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवसेना आमदार किरण सामंत यांनी बँकेचा विशेष गौरव केला. सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार, शेतकरी व सर्वसामान्य सभासदांना दिलेले सक्षम आर्थिक पाठबळ आणि प्रगतिशील धोरणांमुळे बँकेने जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार सामंत यांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयपूर्ण कार्याचे कौतुक करत, भविष्यातही बँकेने सभासदाभिमुख योजना राबवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक शिस्त, आधुनिक बँकिंग सेवा आणि विश्वासार्हतेच्या बळावर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी बँकेच्या कार्याला शुभेच्छा देत विशेष गौरव केला.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून अध्यक्ष, संचालक व अधिकारी यांचे शिवसेनेचे राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी अभिनंदन करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या पत्रात ते म्हणतात की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये बँकेने केलेली उल्लेखनीय आर्थिक प्रगती, आधुनिक व अद्ययावत बँकिंग सेवांचा विस्तार तसेच ग्रामीण भागातील जनता व शेतकरी वर्गाला डिजिटल बँकिंगशी जोडण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेचे हितचिंतक, ग्राहक, ठेवीदार, पतसंस्था, मच्छीमार, शेतकरी वर्ग, सभासद तसेच अधिकारी व कर्मचारीवर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांचा विश्वास, सहकार्य, योगदान आणि परिश्रमातून बँकेने ही उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. या सर्वांच्या योगदानातून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात एक अभिमानास्पद व आदर्शवत कार्य निर्माण केले आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. या यशप्राप्तीमध्ये बँकेचे अध्यक्ष मा. डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रभावी मार्गदर्शनासोबतच संपूर्ण संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाची मेहनत, सुयोग्य नियोजन आणि परस्परांतील उत्कृष्ट समन्वय यांचा अत्यंत महत्वपूर्ण वाटा आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून, कार्यक्षम नियोजनातून आणि समर्पित भावनेने केलेल्या कार्यातून बँकेने ही उल्लेखनीय यशस्वी वाटचाल साध्य केली आहे. येत्या काळात बँकेने ६,००० कोटी रूपयांच्या व्यवसायाचे उद्दीष्ट निश्चित केले असून, हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना मनःपूर्वक शुभेच्छा! रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य व आदर्श बँक म्हणून अधिकाधिक प्रगती करो आणि बँकेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत राहो, असे म्हणून त्यांनी बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांना सदिच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या या सकारात्मक दृष्टी व बँकेबद्दलची आस्था सर्वांना ऊर्जा देणारी आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे.या त्यांच्या आपुलकी व प्रोत्साहन देणाऱ्या पत्राबाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक,अधिकारी व कर्मचारी सर्वांनीच त्यांचे सर्वांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!