Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित!

निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण (ओंकार रेळेकर)पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे संभाव्य मोठे संकट टळले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक श्री. प्रमोद बुरटे यांनी तत्काळ पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांना कळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. कोवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता यंत्रणा घटनास्थळी धाडली आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असतानाच, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा अक्षरशः धावली. सुपरवायझर घडशी, ज्येष्ठ कर्मचारी खांबे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सलग १२ तास जीवाचे रान करत दुरुस्तीचे काम पूर्ण केलेविशेष म्हणजे, संध्याकाळच्या नियोजित वेळेपूर्वीच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा त्रास टळला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाया संपूर्ण कारवाईत पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आले. तातडीचे निर्णय, प्रभावी समन्वय आणि कामावरील पकड यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली. त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठे संकट अवघ्या काही तासांत नियंत्रणात आणले गेले.

घटनेनंतर शहरभरातून श्री. कोवळे आणि त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत असून, “अशाच तत्पर आणि जबाबदार कामाची अपेक्षा आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

✍️जाहिरात….
*🔹रुबाब*
द परफेक्ट मेन्स शॉप
*🗓️१४ एप्रिल*

*⭕फक्त ३०० रुपये*

♦️….खास ऑफर….. खास ऑफर
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या यांच्या जयंतीनिमित्त *रुबाब* तरुणासाठी घेऊन आले आहे.१४ एप्रिल निमित्त *⭕फक्त ३०० रुपये* खास आकर्षक शर्ट उपलब्ध एकदा आवश्य भेट द्या…..

याच बरोबर
🔹शर्ट पॅन्ट 🔹जीन्स 🔹कार्गो पॅन्ट 🔹शॉर्ट पॅन्ट 🔹 फुल साईज शॉर्ट 🔹कुडते 🔹प्रीमियम शर्ट

तसेच ऑर्डर प्रमाणे व्हाईट शर्ट मिळतील
📲 9146116999 / 9545956999

📢 *ठिकाण* : रुबाब द परफेक्ट मेन्स शॉप संस्कृती कॉम्प्लेक्स गांधी होंडा शोरूम समोर बाजारपेठ खेर्डी ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी

*📲 9146116999 / 9545956999*

*🌹भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!