Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

नवभारत एज्युकेशन अवॉर्ड – २०२६ ने रत्नागिरीच्या ‘दि यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग’चा गौरव

संस्थापक अध्यक्ष माजी आ.बाळासाहेब माने,संचालक,शिक्षक वर्ग यांचे होत आहे सर्वच स्तरातून अभिनंदन

रत्नागिरी (पवन न्यूज)रत्नागिरीतील दि यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक नवभारत तर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘नवभारत एज्युकेशन अवॉर्ड – २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
संस्थेला “Most Reputed College of Maharashtra for Nursing and Paramedical Education” हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.याबाबतचे अधिकृत निमंत्रण नवभारत-नवराष्ट्र समूहाकडून यश फाउंडेशनला नुकतेच प्राप्त झाले आहे.

हा पुरस्कार सोहळा उद्या बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट,कफ परेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारामुळे दि यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रातील योगदानाला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून,संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.बाळासाहेब माने,संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही संस्था नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत राहील, असा विश्वास यश फाउंडेशन कडून व्यक्त केला जात आहे.

कोकणातील नर्सिंग शिक्षणाचा विश्वासार्ह दीपस्तंभ; ‘दि यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’ची यशस्वी वाटचाल

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेली दि यश फाऊंडेशन, रत्नागिरी ही संस्था गेल्या तीन दशकांपासून कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि समाजाभिमुख सेवा देत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या ध्येयाने १९ मे १९९५ रोजी संस्थेची स्थापना करण्यात आली.
संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त मा. सुरेंद्रनाथ (बाळ) यशवंत माने यांनी दिवंगत यशवंतराव माने यांच्या प्रेरणेतून संस्थेची उभारणी केली. दर्जेदार शिक्षण, सुलभ आरोग्य सेवा, संशोधन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, युवकांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी या सात प्रमुख उद्दिष्टांवर संस्था सातत्याने कार्यरत आहे.
रत्नागिरीतील दि यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने कोकणातील नर्सिंग शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. संस्थेत ANM, GNM, B.Sc. Nursing, Post Basic B.Sc. Nursing आणि M.Sc. Nursing हे अभ्यासक्रम उपलब्ध असून, अत्याधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट क्लिनिकल प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. संस्थेचे हजारो विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये यशस्वीपणे सेवा बजावत आहेत.
कोविड-१९ महामारीच्या काळात संस्थेने सामाजिक जबाबदारीचे भान राखत उल्लेखनीय कार्य केले. नर्सिंग विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कोविड वॉर्डमध्ये सेवा दिली, जनजागृती, लसीकरण मोहिमा आणि रुग्णसेवेत सक्रिय सहभाग नोंदवून समाजाप्रती असलेली बांधिलकी सिद्ध केली.
भविष्यात नर्सिंगबरोबरच वैद्यकीय शिक्षण, संशोधन, आरोग्यसेवा आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात नवे प्रकल्प उभारण्याचा संस्थेचा संकल्प असून, “ज्ञान, सेवा, संस्कार आणि समाजहित” या मूल्यांवर आधारित कार्यातून कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण त्यांच्या मातीतच उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा निर्धार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!