Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चिपळूणकरांसाठी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भव्य दागिने प्रदर्शन व विक्री

१८ व १९ ऑगस्ट रोजी स्वागत हॉटेल येथे आयोजन

 

  • सोने-चांदीच्या दागिन्यांवर मजुरीवर  १५ टक्के, हिऱ्यांच्या दागिन्यांवर ५० टक्क्यांपर्यंत खास ऑफर

चिपळूण (ओंकार रेळेकर) : चिपळूणकरांसाठी सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या आकर्षक अलंकारांची भव्य पर्वणी उपलब्ध होणार असून महाराष्ट्रातील लोकप्रिय वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या वतीने विशेष दागिने प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवार, दि. १८ आणि बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन चिपळूण शहरातील बुरुमतळी, सेंट्रल बस स्टँडजवळील स्वागत हॉटेल येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने ग्राहकांना पाहता व खरेदी करता येणार आहेत.
वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वतीने या विशेष प्रदर्शनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स ठेवण्यात आली आहे. सोने व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर १५ टक्क्यांपर्यंत सवलत, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे लग्नसराई, सण-उत्सव तसेच विविध शुभकार्यांसाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.
पारंपरिकतेसोबत आधुनिक डिझाइन्सची मेजवानी
वामन हरी पेठे ज्वेलर्स ही दागिन्यांच्या क्षेत्रातील विश्वासार्ह ओळख असून, ग्राहकांच्या आवडीनुसार विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांची निवड या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांसह आधुनिक डिझाइन्स, नेकलेस, हार, बांगड्या, कानातील दागिने, अंगठ्या तसेच हिऱ्यांचे आकर्षक अलंकार प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.चिपळूण आणि परिसरातील ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे दागिने एकाच ठिकाणी पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला ग्राहकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खास ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.प्रदर्शनाचे ठिकाण : स्वागत हॉटेल, सेंट्रल बस स्टँडजवळ, बुरुमतळी, चिपळूण, जि. रत्नागिरी
दिनांक : १८ व १९ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
खास ऑफर : सोने-चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर १५% पर्यंत व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सवलत*
संपर्क : 02140-297890/91, 9594922205/6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!