Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

अखेर तो सीएनजी पंप रात्रीच्या वेळेत राहणार बंद स्थानिक नगरसेवक, नागरिक यांच्या आंदोलनाला यश

स्थानिक नगरसेवक नागरिकांच्या आंदोलनाला यश

 

चिपळूण (ओंकार रेळेकर) रात्रीच्या वेळेत स्थानिक नागरिकांची झोप उडवणारा शिवाजीनगर येथील सीएनजी पंप आता रात्रीच्या वेळेस बंद राहणार आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक शशिकांत मोदी,अंजली कदम आणि नागरिकांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील सीएनजी पंपाच्या धडधडत्या आवाजाबाबत उपायोजना करण्याच्या महानगर गॅस व्यवस्थापनाला स्थानिक नागरिकांनी काही दिवसापूर्वी सूचना केल्या होत्या तरी देखील महानगर गॅस यांच्याकडून काहीही समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे गुरुवारी रात्री प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक शशिकांत मोदी ,नगरसेविका अंजली कदम ,सतीश कदम,अण्णा कदम,श्री.खोत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश अपार्टमेंट मधील नागरिकांनी पुन्हा एकदा महानगर गॅस विक्री सुरू असताना धडक दिली यापूर्वी देखील नागरिकांनी सीएनजी व्यवस्थापनाला रात्रीच्या वेळेत सीएनजी विक्री बंद ठेवावी असे स्पष्ट सांगितले होते. या व्यवस्थापनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने काल रात्री स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. महानगर गॅस पंपा मधील कॉम्प्रेसर धगधगता आवाज यामुळे या परिसरातील रहिवाशांची गेले अनेक वर्ष झोपच उडाली आहे. सीएनजी पंपातील कॉम्प्रेसरचा आवाज कमी करावा किंवा हा कॉम्प्रेसर अन्यस्थळी हलवावा,लॅब मध्ये डिसिबल चेक करावा अशी नागरिकांची सातत्याने अनेक महिने मागणी सुरू आहे. महानगर गॅसचे अधिकारी नागरिकांसमोर तेवढ्यापुरतीच मान डोलवण्याचे काम करत आले आहेत. गुरुवारी रात्री स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत सीएनजी पंपावर धडक दिली.अखेर झालेल्या वादावादी आणि चर्चेतून महानगर व्यवस्थापन मागण्या पूर्ण करीत नाही तो पर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा वाजण्याच्या मुदतीत पंप बंद ठेवण्यात येणार आहे. तेथे एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये सीएनजी भरला जातो यामध्येही बदल करण्यात आला असून एसटी महामंडळाने दिवसभरात सीएनजी भरून घ्यावा रात्रीच्या वरील वेळेत सीएनजी भरता येणार नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. स्थानिक नागरिक आणि महानगरचे अधिकारी यांच्यात झालेल्या गरमागरम चर्चेदरम्यान चिपळूण पोलीस प्रशासनातील काही अधिकारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेच्या मार्गातून ही चर्चा घडवून आली.

फोटो : सीएनजी पंपावर धडक देणारे स्थानिक नागरिक नगरसेवक छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!