Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

रत्नागिरीतील युवकांसाठी खुशखबर! जिजाऊची सर्व सुविधायुक्त मोफत अभ्यासिका सुरू

स्पर्धा परीक्षांसह उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा; प्रवेशासाठी नाव नोंदणी आवश्यक

रत्नागिरी (ओंकार रेळेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग–रत्नागिरी यांच्या वतीने अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनीयुक्त ‘मोफत जिजाऊ अभ्यासिका’ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध न होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी केले आहे.
अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा मोफत
या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट, सर्व सोयी-सुविधांनीयुक्त हॉल, शांत व प्रसन्न वातावरण तसेच A/C आणि Non-A/C व्यवस्था उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी RO मिनरल वॉटर, सुसज्ज बैठक व्यवस्था, जेवणासाठी तसेच वर्तमानपत्र वाचनासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
मुलांसाठी राखीव व अराखीव सीटची सुविधा असून, मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध आहे. अभ्यासिकेची वेळ सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत असणार आहे.
याशिवाय मोबाईल व लॅपटॉप चार्जिंगची सुविधा, वीजपुरवठा खंडित झाल्यास इन्व्हर्टरची व्यवस्था, CCTV कॅमेरे, वर्तमानपत्रे व मासिके तसेच मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘रत्नागिरीचा विद्यार्थी अधिकारी व्हावा’ हा उद्देश
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, या उद्देशाने ही मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. “या अभ्यासिकेचा फायदा घेऊन रत्नागिरीचा विद्यार्थी अधिकारी व्हावा, हाच आमचा उद्देश आहे,” असे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी सांगितले.
प्रवेशासाठी नाव नोंदणी आवश्यक
या मोफत अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून, अभ्यासिकेचे नियम व अटी लागू राहणार आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क :
भूषण बोरसे सर : 9136942001
संदिप पाटील सर : 7755924392
पत्ता : हेड पोस्ट ऑफिससमोर, खंडाळा अर्बन बँकेच्या शेजारी, गाडीतळ, ता. जि. रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!