Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी रंगेहाथ

चिपळूण महसूल विभागातील अधिकाऱ्याला ताब्यात; कारवाईने जिल्ह्यात खळबळ

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी रंगेहाथ

चिपळूण महसूल विभागातील अधिकाऱ्याला ताब्यात; कारवाईने जिल्ह्यात खळबळ

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील महसूल विभागातील एका मंडळ अधिकाऱ्याला सातबारा फेरफाराच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर संबंधित पथकाने सापळा रचला.

चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधित मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महसूल विभागातील एका मंडळ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू असून, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आरोपीच्या नावात ‘उमेद’ आणि ‘राजेशाही’चा ध्वनी दडलेला आहे, अशी चर्चा चिपळूणमध्ये सुरू आहे. अधिकृत तपशील समोर आल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!