महाराष्ट्र

सचिन इलेक्ट्रिकलच्या माध्यमातून सचिन करंजकर यांची व्यावसायिक वाटचाल सुरू; प्रशांत यादव यांनी दिल्या शुभेच्छा

स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे ही रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब : प्रशांत यादव

चिपळूण : चिपळूण येथील व्यावसायिक श्री. सचिन करंजकर यांच्या ‘सचिन इलेक्ट्रिकल’ या नूतन दुकानाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक प्रशांत यादव यांनी काल शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशांत यादव यांनी करंजकर कुटुंबीयांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही व्यवसायाची सुरुवात म्हणजे केवळ आर्थिक प्रगतीच्या दिशेने टाकलेले पाऊल नसून, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचा एक महत्त्वपूर्ण संकल्प असतो. सचोटी, ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि सातत्यपूर्ण मेहनत या गुणांच्या बळावर सचिन करंजकर यांचा ‘सचिन इलेक्ट्रिकल’ हा व्यवसाय यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानिक पातळीवर नवीन व्यवसाय सुरू होणे ही रोजगारनिर्मिती, आर्थिक स्वावलंबन आणि स्थानिक बाजारपेठेच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळाल्यास परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामुळे सचिन करंजकर यांनी सुरू केलेल्या या नव्या व्यवसायाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा, त्यांची व्यावसायिक भरभराट व्हावी आणि यशाचा आलेख सातत्याने उंचावत राहावा, अशा सदिच्छा प्रशांत यादव यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!