
देवरुख : श्री सोमेश्वर ग्रामविकास मंडळ, मुरादपूर यांच्या वतीने गावचे सुपुत्र तथा माजी सरपंच मंगेश रमेश बांडागळे यांची पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा उद्या सोमवार दि.३० मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत सभागृह, मुरादपूर येथे संपन्न होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मंगेश बांडागळे यांनी हातिव गणातून भरघोस मतांनी विजय संपादन केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत असून, त्यांच्या सन्मानार्थ हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मुरादपूर व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सोमेश्वर ग्रामविकास मंडळ, मुरादपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




