रामपूर ते निर्व्हाळ रस्त्यावरचे खड्डे सा.बा. विभाग दोन दिवसात बुजविणार : प. स. सदस्य गौरव पाटेकर
चिपळूण : रामपूर

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण तालुक्यातील रामपूर गुढेफाटा ते निर्व्हाळ पर्यंत चिपळूण गुहागर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रामपूर तळ्याच्याजवळ, त्याचबरोबर रामपूर घाटी मध्ये, तांबी वाकण, तांबी पूल, निर्व्हाळ वाकण येथे मोठे खड्डे पडल्याने सतत अपघात होतात. हे खड्डे मृत्यूचा सापळा बनले आहेत. याबाबत २५ मार्च रोजी चिपळूण तालुका पंचायत समितीची बैठक झाली. त्यावेळी सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. प.स. सदस्य गौरव पाटेकर यांची रामपूर निर्व्हाळ पर्यंत खड्ड्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन याबाबत जोरात आवाज उठवला. २७ मार्च रोजी गौरव पाटेकर सा.बा. विभाग अधिकाऱ्यांना परत भेटले व खड्ड्याची जाणीव करुन दिली. दोन दिवसात खड्डे बुजवतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. जर काम केले नाही तर आपल्या कार्यालयावर जोरदार मोर्चा आणून आंदोलन केले जाईल असा इशारा प.स. सदस्य गौरव पाटेकर यांनी दिला आहे.




