
चिपळूण(ओंकार रेळेकर) चिपळूण शहर मधील परशुराम नगर मधील हॉटेल शालोम ते चिंगळे घर हा रस्ता व्यवस्थित होण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने अचानक मोजणी करून कोणाची किती जागा जाते हे निश्चित केले. हे अचानक कृती करण्याचे कारण ची माहिती घेतली असता धक्कादायक माहिती मिळाली.
हॉटेल शालोम गल्ली मध्ये एक बिल्डिंग होत असून तिचे दोन पिलर रस्ता रुंदीकरणात आल्याची तक्रार नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाली. नगर परिषद रचना विभाग यांनी त्या गल्लीत जाऊन पाहणी केली असता त्या बिल्डिंग चे दोन पिलर रस्ता रुंदीकरणात आले. त्याची मोजणी करत असताना गल्लीतील सर्व घरमालकांना नेमकी कोणाची किती जागा जाते याचे पिवळ्या रंगाने मार्किंग करून देण्यात आले आहे. यावेळी चिपळूण नगर परिषद रचना विभाग व बांधकाम विभाग याचे कर्मचारी हजर होते. हा रस्ता रुंदीकरण व्हावे अशी जनतेची मागणी असून त्या साठी स्थानिक नगरसेवक शशिकांत मोदी व अंजली कदम यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. जे बिल्डर नगर परिषद रस्ता किंवा गटार, नैसर्गिक नाला यावर अतिक्रमण करतील त्यांना कायदा चा धाक दाखवावा असेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्या बिल्डर ला ते दोन पिलर काढण्याची सूचना करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने योग्य भूमिका घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.




