Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

शिल्पाला आकार देऊन स्वप्नातलं घर साकारतो तो शिल्पकार : उद्योजक वसंत उदेग

सन्मान शिल्पकाराचा २०२६’ कार्यक्रमात सुमारे २ हजार शिल्पकारांचा सन्मान

 

चिपळूण (ओंकार रेळेकर) शिल्पकार म्हणजे दगडाला (शिल्प) आकार देणारा, त्याच्या शिल्पामध्ये रूपांतर करणारा म्हणजे शिल्पकार होय. खडी, वाळू, सिमेंट, लोखंड व इतर इमारती सामान एकत्रित करून सुंदर, सुबक आणि आपल्या आयुष्यातलं मनाला भावलेला असं सुंदर घर बनवणारा शिल्पकार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बंधू, ते आपण सगळे शिल्पकार आहात, म्हणूनच आपला हा सन्मान केला जात आहे, असे गौरवोद्गार श्री दत्त एजन्सीज्चे मालक, उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांनी काढले. शहरातील धवल प्लाझा येथे शुक्रवारी दि. ३ एप्रिल रोजी आयोजित ‘सन्मान शिल्पकाराचा २०२६’ कार्यक्रमात उपस्थित सर्व शिल्पकारांना मार्गदर्शन करताना उद्योजक वसंत उदेग बोलत होते.
उपस्थित सर्व शिल्पकारांचा शब्दसुमनाने गौरव करताना उद्योजक वसंत उदेग म्हणाले की, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्री ही पत्नी म्हणून भक्कमपणे पाठिशी उभी असते, त्यामुळे सर्व शिल्पकारांचा याठिकाणी सपत्नीक गौरव केला जाणार आहे. दत्त एजन्सीज् म्हणजे नुसतं व्यापार, बिझनेस आणि सेवा नाही, तर दत्त एजन्सीज् म्हणजे तुमच्या-आमच्यातलं एक परिवाराचं नातं आहे. व्यापार तर होत राहील, सेवा करणे हे आपलं कर्तव्यच आहे, परंतु परिवारातलं नातं जपणं किंवा एकमेकांना परिवारातलं मानणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, असेही उद्योजक दादा उदेग यांनी आपल्या भाषणात सांगितलं.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र स्टेट हेड अवतार सिंग उपस्थित होते. तर व्यासपीठावर टेक्निकल स्टेट हेड सुनील शिंदे, विसाका इंडस्ट्रीज लिमिटेड श्री. शेवकरी, केडी ओसवाल नामांकित पेढीचे चेअरमन दिलीप ओसवाल, परमेश्वरी ट्रेडिंग कंपनीचे भरत शाह, परमेश्वरी पनवेल टाईल्सचे जयेश शाह, ओझोन वॉटर टँक सातारा येथील अजय जाधव, दयाळ उदेग, सौ. श्रद्धा उदेग, सौ. वर्षा उदेग आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख अतिथी अवतार सिंग यांनी शिल्पकारांचा गौरव करताना सांगितले की, कोणत्याही वास्तूमध्ये प्राण ओतणे अथवा एखाद्या प्लान्टला आकार देतो तो म्हणजे शिल्पकार होय. आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिल्पकार हे तुम्हीच आहात, अशा शब्दात गौरवोद्गार काढले. श्री सिमेंट लिमिटेडचे संपूर्ण भारतात २५ प्लान्ट असून रत्नागिरी जिल्ह्यात श्री सिमेंट नंबर वन असल्याचा उल्लेखही अवतार सिंग यांनी आपल्या भाषणात केला. तसेच उद्योजक वसंत उदेग यांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. वसंत उदेग यांनी उद्योग क्षेत्राबरोबरच शेतीतही क्रांती केली असल्याचे श्री. सिंग यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व शिल्पकारांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला खेर्डीतील समृद्धी वॉटरचे नंदू ठोकले व अभिजित बनसोडे, श्री सिमेंट कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पडोळे, रत्नागिरी सेल्स ऑफीसर श्री. मांजरेकर, टेक्निकल ऑफीसर संग्राम लिमकर, महाराष्ट्रातील नामवंत ट्रान्स्पोटर श्री. रावराणे, श्री सिमेंट कंपनीचे सेल्स ऑफीसर गुरूनाथ लोके, श्री. मुंडे, डॉ. फिक्सिट रॉफ टाईल्सचे श्री. संदीपभाई, भूषण मोरे, भार्गवी एन्टरप्रायजेसचे प्रभंजन पिंपुटकर, विसाका इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. मोहसीन, गॅलक्सी डोअर कोल्हापूरचे श्री. कमलेश, श्री. सावन, बर्जर पेंट्सचे किरण देवकाते, इंडिगो पेंट्सचे किरण रहाटे, उद्योजक विलास खेराडे, आरडीसी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर प्रकाश खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उद्योजक वसंत उदेग यांनी मानले.

फोटो : कार्यक्रमाचे फित कापून उद्घाटन करताना श्री सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र स्टेड हेड अवतार सिंग,सुनील शिंदे, श्री. शेवकरी, दिलीप ओसवाल,वसंत उदेग, दयाळ उदेग, सौ. वर्षा उदेग, सौ. श्रद्धा उदेग आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!