Welcome to Pavan News 2611
Click to listen highlighted text!
Welcome to Pavan News 2611
चिपळूण (ओंकार रेळेकर) युवासेना कोकण विभागाचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी उमेश खताते यांची रायगड-रत्नागिरी लोकसभा” युवा सेना सरचिटणीस पदावर नियुक्ती जाहीर केली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पक्षविस्ताराचे कार्य प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी उमेश खताते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
यावेळी विकास गोगावले यांनी उमेश खताते यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिवसेनेच्या विचारांचा प्रसार आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेश खताते यांच्या रूपाने संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर्वी ठाकरे शिवसेना पक्षात खताते यांचे कार्य उल्लेखनीय झाले आहे. उमेश खताते यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!