दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी देवरुखात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
पी. एस.बने इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज आणि आर्चिटर्न्स स्टुडंट्स ट्युटोरिय यांचा उपक्रम

देवरुख (ओंकार रेळेकर)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आय.आय.टी,डॉक्टर,इंजिनिअर होण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच आर्चिटर्न्स स्टुडंट्स ट्युटोरिय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१७ मे रोजी स.११ वाजता देवरुख मधील मराठा भवन देवकाते येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दहावीनंतर योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी उपयुक्त ठरणार असून JEE, NEET आणि MH-CET परीक्षांविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही विविध करिअर पर्याय सायन्स,कॉमर्स,आर्ट्स शाखांबाबत माहिती, IIT / NIT / मेडिकल क्षेत्रातील संधी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.या शिबिरात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, योग्य तयारी आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाच्या अभावामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्याचे वास्तव लक्षात घेऊन ही संकल्पना राबविण्यात आली आहे. शिबिरात IIT / NIT तज्ज्ञ मार्गदर्शक, XI-XII सायन्स सोबत JEE / NEET / MH-CET तयारी, Weekly Tests व Mock Exams, वैयक्तिक Mentorship तसेच शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण याबाबत माहिती दिली जाणार आहे.या कार्यक्रमाला माजी आमदार व सचिव, महाराष्ट्र शिक्षण संस्था डॉ. सुभाषजी बने, पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ. रोहन बने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच आर्चिटर्न्स स्टुडंट्स ट्युटोरियचे संचालक श्री.विजय तिवारी आणि पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. सोमनाथ मिटकरी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.अधिक माहितीसाठी 8459530045 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




