महाराष्ट्र

सहदेव बेटकर यांची भाजपच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र प्रदान

रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

मुंबई (पवन न्यूज) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती आणि भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते सहदेव बेटकर यांची भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मंगळवारी (ता. 30) निवड जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सहदेव बेटकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, भाजपचे जिल्हा चिटणीस तसेच चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, भाजपच्या चिपळूण ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष तसेच भिलेच्या सरपंच सौ. आदिती गुडेकर, चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सरपंच संघटनेचे सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, सल्लागार आणि मालघरचे सरपंच सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!