चिपळूणमध्ये ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची प्रमुख उपस्थिती

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणमधील खेर्डी दत्तवाडी परिसरात महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा उद्योजक आणि दत्तवाडी मित्र मंडळाचे आधारस्तंभ अजिंक्यदादा पवार यांच्या पुढाकाराने दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता खेर्डी दत्तवाडी, कलावती आई मंदिराशेजारील पल्लोड मैदान येथे हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा लोकप्रिय खेळ रंगणार आहे. दिग्दर्शक संतोष ताम्हाणे प्रस्तुत या खेळाचे सूत्रसंचालन होणार असून विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री जानवी किल्लेकर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बंपर बक्षीस म्हणून एक दुचाकी गाडी ठेवण्यात आली आहे. तसेच प्रथम क्रमांकासाठी फ्रिज, द्वितीय क्रमांकासाठी एअर कूलर, तृतीय क्रमांकासाठी मिक्सर आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रेशर कुकर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खेर्डी आणि परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,” असे आवाहन आयोजक अजिंक्यदादा पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.




