महाराष्ट्र

प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे २४ ऑगस्टला पेढांबे मठात अमृततुल्य मार्गदर्शन

श्रावण ग्रंथवाचनाच्या समारोपानिमित्त विशेष सोहळा; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 

श्रावण ग्रंथवाचनाच्या समारोपानिमित्त विशेष सोहळा; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चिपळूण (ओंकार रेळेकर) : अध्यात्मिक जागृती, संस्कार, राष्ट्रभक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधत समाजाला सकारात्मक, संस्कारित आणि शाश्वत जीवनदृष्टी देण्याचे कार्य करणारे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूरचे मठाधिपती परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून चिपळूण येथील पेढांबे मठात आगमन होणार आहे.
श्रावण महिन्यातील ग्रंथवाचन व श्रवणाच्या समारोपानिमित्त हा विशेष आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प. पू. स्वामीजींचे दर्शन, आशीर्वाद तसेच अमृततुल्य प्रवचन व मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून ग्रंथवाचन, श्रवण आणि मननाला विशेष महत्त्व आहे. संत-महात्म्यांचे विचार, धार्मिक ग्रंथ तसेच सद्ग्रंथांचे श्रवण केल्याने जीवनाला योग्य दिशा मिळण्याबरोबरच संस्कार, सकारात्मक विचार आणि आत्मचिंतनाची प्रेरणा मिळते. ग्रंथवाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून सद्विचारांची जोपासना आणि संस्कारक्षम समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे.
याच परंपरेला पुढे नेत श्रावणातील ग्रंथवाचनाचा समारोप प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या अमृततुल्य मार्गदर्शनाने होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अध्यात्म आणि संस्कारांसोबतच आदर्श जीवनशैली, युवापिढीचे देशासाठी समर्पण, निसर्गाशी सुसंवाद, जीवसृष्टीबद्दल करुणा आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धती याबाबत समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
📍 कार्यक्रमाची माहिती
दिनांक : सोमवार, २४ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ६ वाजल्यापासून
स्थळ : समर्थ काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्र, पेढांबे मठ, चिपळूण
परिसरातील सर्व गुरूबंधू-भगिनी, भाविक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प. पू. स्वामीजींच्या अमृततुल्य प्रवचनाचा, दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!