
दैवज्ञ भवनाच्या भूमिपूजनाने अलिबागमध्ये नव्या वास्तूच्या उभारणीला शुभारंभ
अलिबाग (पवन न्यूज) दैवज्ञ समाज, अलिबाग यांच्या नियोजित दैवज्ञ भवनाच्या उभारणीसाठी शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी भूमिपूजन व गणेश पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भवनाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी बिल्डर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या उपस्थितीत विधिवत गणेश पूजन करण्यात आले तसेच श्रीफळ वाढवून मंगलमय वातावरणात कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी माननीय श्री. प्रशांत अनंत पालशेतकर, डॉ. नंदकुमार द्वारकानाथ राजपुरकर, श्री व सौ. साष्टे, श्री. वेदक, श्री व सौ. बेल्हेकर तसेच दैवज्ञ समाज, अलिबागचे पदाधिकारी, समाजबांधव आणि बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर श्री. प्रशांत उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या मंगल सोहळ्यामुळे दैवज्ञ समाजाच्या नव्या वास्तूच्या उभारणीला शुभारंभ झाला. उपस्थितांनी या मंगल कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत दैवज्ञ भवनाचे स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावे आणि हे भवन समाजाच्या प्रगती, एकजूट व विकासासाठी प्रेरणादायी ठरावे, अशी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेश चरणी प्रार्थना केली. 





