महाराष्ट्र

स्वच्छतेसाठी एकजूट; पर्यावरण रक्षणासाठी स्कॉन चा संकल्प!

गणेशोत्सवानंतर पुण्यात स्वच्छता मोहीम एका तासात तब्बल १,००० किलो कचरा संकलित

स्वच्छतेसाठी एकजूट; पर्यावरण रक्षणासाठी स्कॉन चा संकल्प!

गणेशोत्सवानंतर पुण्यात स्वच्छता मोहीम
एका तासात तब्बल १,००० किलो कचरा संकलित

पुणे (ओंकार रेळेकर)गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या कचऱ्याचे योग्य संकलन करून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने स्कॉन प्रोजेक्ट,रोटरी क्लब आणि स्कॉन प्रो फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्कॉन प्रोजेक्टचे श्री. निलेशजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत स्कॉनचे सुमारे ३५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. पुण्यातील बाबा भिडे पूल ते अलका टॉकीज चौक या परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवत अवघ्या एका तासात तब्बल १,००० किलो कचरा संकलित केला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी रस्ते व परिसरातील कचरा गोळा करून त्याचे संकलन केले. या उपक्रमाला पीएमसी आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद आणि श्री. रोहित महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या संपूर्ण मोहिमेचे श्री. निनाद निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली. तसेच श्री. महेश मायदेव, सौ. अंजली काळे, श्री. शैलेश मोरे, श्री. संजय रोडे, श्री. राहुल पुरकर, श्री. अपूर्वा ब्राम्हणे आणि श्री. संदीप देवकर यांनीही उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.स्वागत श्रद्धेने, निरोप जबाबदारीने’या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना श्री. निनाद निलेश चव्हाण म्हणाले,
“बाप्पा येणार म्हणून आपण घर, मन आणि परिसर सजवतो; बाप्पा निरोप घेतात तेव्हा त्याच परिसराची स्वच्छता करून निसर्ग जपणे, हीदेखील भक्तीच आहे. स्वागत श्रद्धेने… निरोप जबाबदारीने… हीच बाप्पांप्रती खरी सेवा!”
गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्सव साजरा करण्यासोबतच उत्सवानंतरचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!