Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
Uncategorized

भाजपच्या विजयाचा पेढे वाटून चिपळुणात जल्लोष

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टी चा पश्चिम बंगाल, आसाम व  पौंडिचेरी या निवडणुकीत दणदणीत विजय झाला त्याबद्दल चिपळूण शहर मंडला तर्फे विजयि जल्लोष साजरा करण्यात आला.  जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिंचनका येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मार्गदर्शक सौ.अर्चना बक्षी मॅडम यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, व शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांना प्रथम विजयाचा पेढा भरवला. यावेळी भारतीय जनता पार्टी चा विजय असो, नरेंद्र मोदी साहेब आगे बढो, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी फक्याक्याची आतषबाजी करण्यात आली. यावेळी वाहनचालक, पादचारी बंधू आणि भगिनी यांना पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तर चे सतीश मोरे, जिल्हासरचिटनीस स्वानंद रानडे, कोषाध्यक्ष आशिष खातू,शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष सौ.रुपाली दांडेकर, अल्प  संख्यांक जिल्हा अध्यक्ष लियाकत शहा,सरचिटणीस सारिका भावे, विनायक वरवडेकर, महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर, सभापती शुभम पिसे, नगरसेविका अंजली कदम, शीतल रानडे, नगरसेवक संदीप भिसे, माजी नगरसेवक विजय चितळे, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर,मधुकर निमकर,महेश दीक्षित, प्रणय वाडकर,विमल लढ्ढा, संगीता पालकर, प्राजक्ता टाकळे, प्रभंजन पिंपुटकर, अमोल तटकरे , अक्षय ओतारी महेश कांबळी, जगदीश गोरीवले, महेश विंचू आदी उपस्थित होते.
फोटो: विजयाचा जल्लोष करताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!