
खेड (पवन न्यूज)खेड शहरातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते रहीम भाई सहिबोले यांच्या नगरपालिकेतील नवीन दालनाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या शुभहस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नालीताई राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद नांदगावकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, माजी नगराध्यक्ष उर्मिलाताई शेट्ये पाटणे, भाजपा महि
ला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रितीताई चिखले, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन दालनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी रहीम भाई सहिबोले यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.




