Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

आ. भास्करराव जाधव यांची उदया सर्वपक्षीयांसह पत्रकार परिषद

संसदेत नाकारलेल्या विधेयकांमागील वास्तवावर बोलणार

चिपळूण: संसदेत मांडलेल्या आणि नामंजूर झालेल्या महिला आरक्षणासह इतर विधेयकांमागील वास्तव यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गुरूवार, दि. २३ एप्रिल २०२६, सकाळी ११.०० वा.शिक्षक पतपेढी सभागृह प्रांत कार्यालय जवळ पत्रकार परिषद आयोजित केली असून यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेमध्ये दि. १६ ते १८ एप्रिल २०२६ यादरम्यान झालेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण कायदयात दुरूस्ती करण्यासंबंधीचे १३१ वे घटनादुरूस्ती विधेयक तसेच सीमांकन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) अशी तीन विधेयके मांडण्यात आली. मात्र दोन दिवसांच्या चर्चेअंती तिन्ही विधेयके नाकारली गेली. आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत आणि महिला आरक्षणासह अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी मांडलेली विधेयके नाकारली गेली, त्यामागची वस्तुस्थिती काय? हे जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे. त्यामुळेच राष्ट्राचं ऐक्य, संविधानाने दिलेले अधिकार आणि नाकारली गेलेली विधेयके यासंदर्भात आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

देशाच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या विषयावरील पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी देशाचे एक नागरिक या नात्याने उपस्थित राहून पत्रकारांबरोबर या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!