Welcome to Pavan News 2611
Click to listen highlighted text!
Welcome to Pavan News 2611
चिपळूण : भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. हा उद्घाटन सोहळा विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
चिपळूण शहरातील कृष्णेश्वर नगर, गाळा क्रमांक ६, पाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असून या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, पक्ष संघटनात्मक कामकाज तसेच विविध विकासविषयक उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शुभप्रसंगी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.
जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!