चिपळूणातील भाजपचे नूतन कार्यालय आगामी काळात सत्ताकेंद्र बनेल : आ.प्रमोद जठार
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणच्या गल्ली मधील भाजप प्रशांत यादव यांनी हायवेवर आणली,आता हायवे वरून प्रशांत यादव थेट विधान भवनात प्रवेश करतील.विधानसभेत फक्त प्रवेशच नव्हे तर पुढील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करतील.असा विश्वास व्यक्त करत आमदार प्रमोद जठार यांनी आता थांबायचे नाही,आज पासूनच नव्हे तर आता पासून कामाला लागा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व उपस्थित कार्यकर्त्यांना केले.आता सतप्रतिशत भाजप हे ध्येय असले पाहिजे असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मुंबई गोवा महामार्गावरील कुरनेश्वर पाग येथे भाजपचे नूतन जनसंपर्क कार्यालय उभारले असून त्याचा उदघाटन सोहळा रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.अत्यंत दिमाखदार आशा या उदघाटन सोहळ्याला भाजप नेते आमदार प्रमोद जठार प्रमुख उदघाटक म्हणून उपस्थित होते.फित कापून आमदार प्रमोद जठार यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले तर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.यावेळी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात येत होती.
यावेळी आमदार जठार म्हणाले मी कार्यकर्त्यांचा आमदार आहे.मी जनतेतून निवडुन आलेलो नाही तर पक्षान मला आमदारकी दिली आहे.पक्ष म्हणजेच पक्षाचे कार्यकर्ते,त्यामुळे मी कार्यकर्त्यांचा आमदार असल्याने सतत कार्यमर्त्यामध्ये राहून त्यांचे म्हणणे ऐकून घेत असतो.त्यामुळे मी सतत फिरत राहतो.चिपळूण मध्ये देखील मी सतत येत असतो, या पुढे देखील मी येथे येत राहणार आहे.आज प्रशांत यादव यांच्या कार्यालयाच उदघाटन माझ्या हस्ते झाले याचा मनस्वी आनंद मला आहे.
या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेची सेवा होत राहील.कार्यकर्त्यांचे प्रश्न येथून सोडवले जातील. आणि भारतीय जनता पार्टीला या कार्यालयातून नवे बळ मिळेल असेही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून किती तास झोपतात हे माहीत नाही,पण त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आणि गेली १२ वर्षातील पंतप्रधान पदाचा कार्यकाळ बघता ते अहोरात्र काम करत आहेत.देव, देश,धर्म सर्व क्षेत्रात त्यांचे काम असून ते आपल्या देशातील एक यशस्वी पंतप्रधान ठरले आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. असे आम.जठार म्हणाले.
चिपळूणात गल्लीतली भाजप असा उल्लेख केला जात होता.प्रशांत यादव यांनी गल्लीतील भाजप हायवेवर आणली,आता हायवेवरून प्रशांत यादव थेट विधानभवनात पोहचतील आणि विधान भवनात नव्हे तर भाजपच्या मंत्रिमंडळात प्रशांत यादव दिसतील.दस्तरखुद्द नरेंद्रचर्याजी महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत.त्यामुळे प्रशांत यादव आता थांबायचे नाही.सुसाट धाव घ्यायची आहे.असेही ते म्हणाले.
आता शतप्रतिशत भाजप-प्रशांत यादव
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मी न थांबता काम करत आहे.पक्षाचे जिल्ह्याचे कार्यालय रत्नागिरी आहे.परंतु चिपळूण आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जनतेला,कार्यकर्त्यांना सहज भेटता यावे,संपर्क आणि समन्वय कायम रहावा यासाठी चिपळूणमध्ये कार्यालय असावे अशी मनोमन इच्छा होती.योग्य अशी जागा आम्ही शोधत होतो.आता महामार्गवरच जागा उपलब्ध झाली आहे.या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेची कामे होतील आणि आगामी काळात जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप दिसेल असा विश्वास प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वाशिष्ठी डेअरी च्या मुख्य प्रवर्तक सौ.स्वप्ना यादव,चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ.स्मिता सुभाषराव चव्हाण,ऍड.नयना पवार, जिल्हाउपाध्यक्ष बळीराम मोरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा,जी.प सदस्य रावी मोरे,दीप्ती महाडिक, तालुका मंडळ अध्यक्ष विनोद भुरण,उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर,नगरसेविका अंजली कदम,वैशाली निमकर,रसिका देवळेकर,नगरसेवक शुभम पिसे,शशिकांत मोदी,सुप्रियाताई उतेकर,माजी नगरसेवक विजय चितळे,रामदास राणे, योगेश शिर्के,स्वानंद रानडे,नगरसेविका शीतल रानडे,विजय देसाई,निलेश भुरण,जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत जाधव,संगमेश्वर मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




