Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार प्रदान

चिपळूण

 

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबंकर यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लोकाभिमुख आणि संवेदनशील कार्याची दखल घेत नवभारत–नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार शनिवारी सकाळी चिपळूण शहरातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला या सोहळ्याला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, भाजप नेते प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, अभिनेत्री साक्षी गांधी, मानसी पेढांबकर यांच्यासह नवराष्ट्र मीडियाचे अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.मंगेश पेढाबंकर यांनी प्रशासनात काम करताना कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे केवळ कागदोपत्री विषय म्हणून न पाहता, ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची कार्यशैली जोपासली आहे.सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे त्यांनी आपल्या सेवाकाळात चिपळूण नगर परिषद, रत्नागिरी नगर परिषद तसेच गुहागर नगर पंचायत येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. बदल्या, पदोन्नती आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रवासात त्यांनी शिस्त, कार्यतत्परता आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम ठेवला विशेष म्हणजे, संकटसमयी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे, नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक, सहकारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळेच ते केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाशी जोडलेला आणि माणुसकी जपणारा चेहरा म्हणूनही परिचित आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आलेला ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ हा सन्मान केवळ वैयक्तिक पुरस्कार नसून, प्रामाणिक, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणाऱ्या प्रशासनाच्या विचाराला मिळालेली दाद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!