Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला ३९.५० लाखांचा दंड; देवरूख न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

देवरुख :

 

देवरूख : पवन न्यूज : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरीच्या देवरूख शाखेने दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात देवरूख येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना दोषी ठरविले आहे. न्यायालयाने आरोपीस एकूण ३९.५० लाख रुपयांचा दंड तसेच साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव कारावास भोगावा लागेल, असे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरूख शाखेकडून आरोपीला वाहन कर्ज मंजूर करण्यात आले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने बँकेला धनादेश (चेक) दिला होता. मात्र संबंधित खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने हा चेक अनादरित (बाऊन्स) झाला. त्यानंतर बँकेने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट कलम १३८ अंतर्गत देवरूख न्यायालयात दावा दाखल केला होता.या खटल्यात बँकेच्या वतीने अँड. वाय. जी. चंदगडकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी सादर केलेले दस्तऐवज, पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून दंड व कारावासाची शिक्षा सुनावली.निकाल देताना न्यायालयाने चेकद्वारे दिलेले आर्थिक आश्वासन पाळणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे ही कायद्याची मूलभूत अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे बँकिंग व्यवहारांमध्ये शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.कायदा तज्ज्ञांच्या मते, चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये हा निकाल मार्गदर्शक ठरणारा असून बँकांची थकीत कर्जे वसूल करण्याच्या प्रक्रियेला बळ मिळणार आहे. तसेच चेक देताना आर्थिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!