Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

श्री संजय काशिद यांची ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ कोंकण’च्या संघटकपदी नियुक्ती

दापोली : पवन न्यूज 

पर्यटन व्यावसायिक महासंघ कोंकण तर्फे संघटनेच्या विस्तार आणि बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महासंघाच्या ‘संघटक – कोंकण पर्यटन विभाग’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर श्री. संजय काशिद यांची सर्वानुमते व श्री विष्णु (बाबा) मोंडकर राष्ट्रीय अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.

कोंकणच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करणे आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावणे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. संजय काशिद यांचा पर्यटन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक व राजकीय कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोकणातील पर्यटन क्षेत्राला अधिक संघटित करून जागतिक स्तरावर नेण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ कोंकण’च्या (Konkan Paryatan Vyavsayik Mahasangh) कोंकण पर्यटन विभाग संघटक या अत्यंत जबाबदारीच्या पदी श्री संजय काशिद यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कोकणातील पर्यटन उद्योगात आनंदाचे वातावरण असून, पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
श्री संजय काशिद हे स्वतः एक अनुभवी पर्यटन व्यावसायिक आणि ‘तनय ड्रिमवर्ल्ड टुरिझम’चे संचालक आहेत. याआधीही त्यांनी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून, पर्यटन वाढीसाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. दापोलीसहित संपूर्ण कोंकणात पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!