Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

उद्या साडवली येथे भव्य वनमहोत्सव कार्यक्रम; औषधी व दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप

देवरुख :

संगमेश्वर (पवन न्यूज)शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, तालुका संगमेश्वर आणि वनविभाग रत्नागिरी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, रविवार दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य वनमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात औषधी तसेच दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून विविध प्रजातींच्या रोपांचे नागरिकांना मोफत वितरणही करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्षलागवड करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन मा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, आमदार शेखर निकम, किरण सामंत, माजी आ. डॉ.सुभाष बने यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल व वन विभागातील अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात शेतकरी, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षलागवडीच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन शेतकरी लाकूड व्यापारी संघटना अध्यक्ष आयोजक श्री.किरण जाधव
यांनी केलेआहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!