महाराष्ट्र
भास्कर जाधव यांनी जिल्हा बँकेला लिहिले अभिनंदनाचे पत्र
अध्यक्ष,संचालक व अधिकारी यांचे केले अभिनंदन

चिपळूण (ओंकार रेळेकर) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीबाबत आमदार भास्कर जाधव यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत त्यांनी बँकेला अभिनंदनाचे पत्र लिहिले असून, अध्यक्ष, संचालक व अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.
भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो या वर्षीचा अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये बँकेची होत असलेली प्रगती समाधानकारक अशी आहे. अनेक प्रगतीची ध्येय ओलांडून बँकेने ग्रामीण दुर्गम भागातील शेतकऱ्यांना डिजिटल प्रवाहात आणून डिजिटल बँकिंग व्यवहारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल मला अभिमान आहे.
आमदार भास्कर जाधव यांच्या या सकारात्मक दृष्टी व बँकेबद्दलची आस्था सर्वांना ऊर्जा देणारी ठरली आहे.




