Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

खेडमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत

खेड :

खेडमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत

खेड (ओवेस चौगुले यांस कडून)  महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शनिवारी खेड येथे आगमन होताच भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप खेड शहर, भाजप युवा मोर्चा आणि भाजपप्रणित रिक्षा सेलच्या वतीने भरणे नाका येथे जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी खेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांना गती देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
या स्वागतप्रसंगी भाजप आमदार प्रमोद जठार, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजप खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद (दादू) नांदगांवकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, महिला मोर्चा शहराध्यक्षा आशा सनगरे, महिला मोर्चा उपशहर अध्यक्षा मिनल गुहागरकर, भाजपप्रणित रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, उपाध्यक्ष अविराज मोरे, शहर चिटणीस राकेश चव्हाण, मंदार आपटे, शशांक सिनकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, उपाध्यक्ष रूपेश तावडे, संभाजी देवकते, माजी नगरसेवक संदेश भुवड, सुयश (बॉबी) खेडेकर, अनिल सनगरे, बाळू वर्मा, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, काळकाई देवी रिक्षा स्टँड भरणे अध्यक्ष अमित गीते, तुषार पवार, दीपक निकम, संदीप कोपकर, मीनाताई ठाकरे, रिक्षा स्टँड अध्यक्ष संदीप शेडगे, रेवन नाथ, रेमजे राम उसरे, शौकत पेढेकर, जयेश गुहागरकर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरणे नाका परिसर घोषणाबाजी, पुष्पगुच्छ आणि सत्काराने दणाणून गेला असून, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वागत सोहळ्याला उत्सवी वातावरण लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!