Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

सीमेवरील वीर जवानांसाठी ४२०० विद्यार्थ्यांच्या हातून राख्यांची अनोखी ओवाळणी!

युनायटेड इंग्लिश स्कूलचा ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम; १७ ऑगस्टला भव्य रॅली

चिपळूण (ओंकार रेळेकर) : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणतर्फे ‘माझा देश, मी देशाचा’ या उपक्रमांतर्गत यंदाही ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील तब्बल ४२०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांना पाठविण्यात येणार आहेत.याबाबत बुधवारी युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्याध्यापक बनसोडे,मुख्याध्यापिका पद्मजा येसादे,यांनी माहिती दिली. सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, प्रेमाजीभाई आसर मराठी माध्यम स्कूल, गुरुकुल तसेच अन्य शाखांमधील विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी विशेष राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांसोबत शाळेचे पत्र तसेच राखी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसेही पाठविण्यात येणार आहेत. प्रत्येक राखी संबंधित जवानापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासोबतच सैनिकांविषयी आदर निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मातृभूमी पूजन व राखी पूजन करण्यात येणार आहे. शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे वडील सैन्यात कार्यरत आहेत, त्यांच्या मातांच्या हस्ते राखी पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी राख्या घेऊन रॅलीच्या माध्यमातून चिपळूण पोस्ट कार्यालयाकडे रवाना होतील. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक रॅलीचे नेतृत्व करणार आहे.
रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून, चिपळूण नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही पूजन केले जाणार आहे. राख्या घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
रॅलीनंतर सैनिकांना पाठविण्यासाठी राख्या पोस्ट कार्यालयात सुपूर्द करण्यात येतील. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी संजय मोहिते, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच पोलिस व शासकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅली शाळेत परतल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. मागील वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा परशुराम एज्युकेशन सोसायटीचे १२५वे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.यावेळी परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण शैक्षणिक संकुलयुनायटेड इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक संजय बनसोडे,
प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका संगीता नाईक,सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका पद्मजा येसादे,
सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका साक्षी गोरीवले,प. ए. सोसायटी शिशुविहार विभाग चिपळूण विभाग प्रमुख श्रुती रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

फोटो : जवानासाठी राखी या उपक्रमाविषयी माहिती देताना मुख्याध्यापिका पद्मजा येसादे,
संजय बनसोडे,आणि मुख्याध्यापक छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!