Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने शिवधामापूर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव

दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; पारंपरिक सोंगी जाखडी व टिपरी नृत्य ठरणार आकर्षण

श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने शिवधामापूर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव

दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; पारंपरिक सोंगी जाखडी व टिपरी नृत्य ठरणार आकर्षण

संगमेश्वर  :  तालुक्यातील शिवधामपूर (भुसेवाडी) येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी ६६ वा श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६ आणि शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री राधाकृष्ण कृपेने तसेच ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने भाविकांनी नातेवाईकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजता पूजा व आरती, सायंकाळी ७ ते ८ वाजता हरिपाठ, तर रात्री ९ ते १२ वाजता श्री ओमसाई प्रसादिक भजन मंडळ, डावखोल (कडेवठार) यांचे बुवा प्रमोद शिंदे यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ११ वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा, तर रात्री १२.३० वाजता पारंपरिक सोंगी जाखडी सादर करण्यात येणार आहे.शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ वाजता पूजा व आरती, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पारंपरिक टिपरी नृत्य, दुपारी २ वाजता महाप्रसाद आणि दुपारी ३.३० वाजता दहीहंडी उत्सव होणार आहे.या उत्सवासाठी मंदिराची आकर्षक सजावट व लाईटिंगची व्यवस्था कु. रुद्र उमेश भोजने यांच्या सौजन्याने करण्यात आली आहे. तसेच पारंपरिक सोंगी जाखडी कार्यक्रमाचे सौजन्य श्री.विलास आत्माराम मुरारी यांचे आहे.या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकृष्ण मित्र मंडळ, शिवधामपूर (भुसेवाडी), ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!