खेर्डी एमआयडीसी मधील ‘इम्पेरियल इंडस्ट्रीजला लागलेल्या भीषण आगीत झालेल्या नुकसानीची आमदार अनिकेत तटकरे यांनी केली घटनास्थळाची पाहणी
खेर्डी :

खेर्डी एमआयडीसी मधील ‘इम्पेरियल इंडस्ट्रीजला लागलेल्या भीषण आगीत झालेल्या नुकसानीची आमदार अनिकेत तटकरे यांनी केली घटनास्थळाची पाहणी
चिपळूण (ओंकार रेळेकर)खेर्डी एमआयडीसी परिसरातील २० गुंठे क्षेत्रात असलेल्या ‘इम्पेरियल इंडस्ट्रीज’ या फर्निचर कारखान्याला २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कारखान्यातील ऑस्ट्रेलियातून मागविण्यात आलेल्या १२ आधुनिक मशिनरी, तयार फर्निचर, रॉ मटेरियलसह संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत दादा सुनील तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कारखान्याचे मालक निहालभाई मालानी यांची भेट घेऊन आगीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
आमदार तटकरे यांनी दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासन स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे उद्योजकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ शेठ खताते, तालुकाध्यक्ष नितीन (अबुशेठ) ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, उपसरपंच अभिजीत खताते, तसेच सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, राजेश सुतार, विनोद खताते यांच्यासह गणाध्यक्ष गणेश भुरण, सचिन ठसाळे, सचिन भोसले, भाऊ भुरण, राजेश भुरण, एमआयडीसी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या भीषण आगीमुळे खेर्डी एमआयडीसीतील उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली असून, नुकसानीचे नेमके मूल्यांकन आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आता लक्ष लागले आहे.




