जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत एम.आय. हजवानी स्कूलची दमदार कामगिरी
चार रौप्यपदकांसह तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई; खेळाडूंचे यश

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत एम.आय. हजवानी स्कूलची दमदार कामगिरी
चार रौप्यपदकांसह तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई; खेळाडूंचे यश
खेड (ओंकार रेळेकर) अल-मदीना वेल्फेअर असोसिएशन संचलित एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खेड येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजनगटांमध्ये सहभागी होत एकूण पाच सुवर्णपदके आणि तीन रौप्यपदके पटकावली.
यामध्ये खुलूद वसीम खल्फे याने १४ वर्षांखालील ५८ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले. अम्मारा वसीम अंतुले हिने १७ वर्षांखालील ४० किलो वजनगटात रौप्यपदक, तर सलमान वाहिद पिपुळकर याने १७ वर्षांखालील ५१ किलो वजनगटात रौप्यपदक पटकावले. झैद इम्रान मुकादम याने १९ वर्षांखालील ७९ किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले.
तसेच मुहम्मद जाहिद मकबूल चौगले याने १९ वर्षांखालील ९२ किलो वजनगटात, नाईल नदीम सारंग याने १७ वर्षांखालील ९२ किलो वजनगटात, अझहर अन्वर जुकार याने १९ वर्षांखालील ८६ किलो वजनगटात आणि आसिम अब्बास पारकर याने १७ वर्षांखालील ११० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे शाळा व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवर्ग, क्रीडा प्रशिक्षक आणि पालकांनी अभिनंदन केले असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली आहे.




