महाराष्ट्र

श्री देवी काळकाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

नवरात्रीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)खेड तालुक्यातील भरणा नाका येथील श्री देवी काळकाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांसाठी दररोज विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व शासकीय सलामी सकाळी ८ वाजता होणार असून, रात्री गावातील जाखडी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. भागवत महाराज भारती (देवाची आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी डबलबारी नाचाचा जंगी सामना रंगणार असून, शाहीर/कवींच्या सहभागाने हा कार्यक्रम होणार आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी येणारे जाखडी नृत्य व दांडियाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.येसरे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून, रात्री दांडिया कार्यक्रम होईल. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी येणारे भजन मंडळ तसेच जेष्ठ नागरिक श्री संत ज्ञानेश्वर महाराज नाम मंडळ (चिखलवाडी) यांचा सहभाग राहणार आहे.शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा डबलबारी नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी येणारे भजन मंडळ तसेच गावातील महिलांचा सहभाग असलेले विविध कार्यक्रम होणार आहेत. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजीही डबलबारी नाचाचा जंगी सामना होणार आहे.मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसरा-दांडिया उत्साहात साजरा केला जाणार आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून, यावेळी श्री भैरी जोगेश्वरी केदारनाथ भजनी नमन मंडळ (आयनी भोईवाडी) यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ‘किल्ले फत्ते’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून, निर्मिती शाहीर रत्नाकर महाकाळ यांची आहे.नवरात्रोत्सव काळात दररोज काकड आरती सकाळी ५ वाजता, महाआरती सायंकाळी ६.३० वाजता तसेच हरिपाठ सायंकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी काळकाई मंदिर उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!