चिपळुणात मंगळवारी भाजपची राष्ट्रचिंतन बैठकप्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या अभियानांतर्गत भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिपळुणातील शिक्षक पतपेढी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.या राष्ट्रचिंतन बैठकीत लोकशाहीचे संवर्धन, लोकशाही मूल्यांचे रक्षण, देशाची एकात्मता व राष्ट्रीय विचारधारेचे महत्त्व तसेच सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका आणि आगामी काळातील संघटनात्मक दिशा यावर विचारमंथन होणार आहे.लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका, जनतेपर्यंत राष्ट्रहिताचे विचार प्रभावीपणे पोहोचविणे आणि संघटनात्मक पातळीवर अधिक जोमाने काम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी केले आहे.




