
भाजप अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी रवींद्र तटकरे यांची नियुक्ती
चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण)चे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप भिसे यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारणी जाहीर केली असून जिल्हा सरचिटणीस पदावर रवींद्र तटकरे यांची नियुक्ती केली आहे.
नगरसेवक संदीप भिसे यांच्याकडे अनुसूचित जमाती मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे.अनेक तरुण व नवीन चेहऱ्यांना पक्षात आणून त्यांनी एक ।जबुत जिल्हा कार्यकारणी तयार केली आहे.या नूतन कार्यकारणीला जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नुकतीच मंजुरी दिली होती.त्यानुसार आता पद नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत.भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हा सरचिटणीस पदावर नुकतेच रवींद्र तटकरे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.यावेळी अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप भिसे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार,जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, स्वानंद रानडे,चिपळूण शहर मंडल अध्यक्ष आशिष खातू. महिला मोर्चा शहराध्यक्ष रुई खेडेकर. नगरसेविकास शितल रानडे. विनायक वरवडेकर. कुणाल आंबेकर. सर्वेश सुर्वे. अभिषेक साळुंखे. दिनेश लटके. नरेंद्र बेलवलकर. अजय चव्हाण. यांच्यासह भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : भाजप अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी रवींद्र तटकरे यांना नियुक्ती पत्र देताना नगरसेवक संदीप भिसे आशिष खातू आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




